शहापूर तालुक्याची पार्श्वभूमी (इतिहास) :- शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रिटिशकालीन तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे. शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी "कोळवण" तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील "मिलिटरी डीपार्टमेंट डायरी" क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स . १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवण चे रुपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते.
![]() |
🗺️ शहापूर तालुक्याचा भौगोलिक नकाशा |
तेथे
वास्तव्य करणारा समाज:- आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी
तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, कातकरी, महादेव कोळी, या,
आदिवासी जमाती आहेत तसेच शहापूर तालूक्यात एकूण लोकसंख्येत कुणबी, आगरी, बौद्ध, मुस्लिम
व मराठा समाजाची लोकसंख्या आहे.
शहापूर
तालुक्यातील रेल्वे स्थानके :- कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर
सुरु झाले. १ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले.
मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरात The Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात
येवून वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५
रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंदला पोहचून
ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर
१८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश
असणाऱ्या शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील
विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता. शहापूर तालुक्यातील वासिंद
हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या
थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा,
शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर
तालुक्यात येतात. ब्रिटीश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या
मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव हे नाव अलीकडील असून त्याचे
पूर्वीचे नाव शहापूर होते. आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर आहे.
🚉 आसनगाव रेल्वे स्टेशन:– स्थापना आणि इतिहास :- नॉर्थ‑ईस्ट मुख्य रेषा (North‑East Main Line) ठाणे ते सासवळा विस्तारण्यात आल्यानंतर २३ जानेवारी १८६० या दिवशी Shahapur (Asangaon) स्टेशनचा उद्घाटन झाला IRFCA
➡️ म्हणजेच, Asangaon स्टेशनची स्थापना २३ जानेवारी १८६० रोजी झाली होती.
ℹ️ अतिरिक्त माहिती:- हा मुंबई Suburban Railway च्या Central Line वरचा एक प्रमुख स्टेशन आहे.
शहापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागांना सेवा पुरवणारा हा एकमेव स्टेशन आहे. दिवसभर सुमारे ७५ हजार प्रवासी या स्टेशनवरून सुटतात, म्हणून हा खूप व्यस्त स्टेशन म्हणून ओळखला जातो
![]() |
२३ जानेवारी १८६० या दिवशी Shahapur (Asangaon) स्टेशनचा उद्घाटन झाला. |
ऐतिहासिक ठिकाणे :- माहुली किल्ला, आजोबा (आज्या) पर्वत
![]() |
माहुलीचे पिनाकल – पर्वत आणि निळसर आकाशाचा संगम |
![]() |
माहुली ट्रेक – थंड हवामानात ट्रेकर्सचा समूह |
![]() |
माहुली येथील पर्वतरांगेवरील हरित दृष्टी आणि धुके |
पर्यटन स्थळे :- ठाणे जिल्हयातील शहापुर तालुका हा सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या या तालुक्यात पाहण्यासारखी खूप सारी ठिकाणे आहेत ती आशी अशोका धबधबा, मानसमंदिर, शेलवली खंडोबाची प्रती जेजूरी, पांडवलेणी पुणधे-आटगांव, टाकीपठार तीर्थ क्षेत्र, चोंढे धबधबा, गंगा देवस्थान, स्काय ब्लु वॉटरफॉल, भातसा पिकनिक पॉईंट, मुरबी धरण, ढेंगनमाल वॉटरफल, तानसा डॅम ईसलँड व्हिव, पाझर तलाव, टाकेश्वर वॉटरफॉल, गंगा गोरेश्वर शिव टेम्पल मढ, मोहिपाडा वॉटरफॉल, बागराव वाडा, खोका वॉटरफॉल, पिकनिक स्पॉट नेअर रोडवहाल, डोळखांब लेक
मुख्य जलस्त्रोत धरणे :- तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसा नदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी येथे उल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धरण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.
![]() |
खर्डी – शहापूर तालुक्यातील हरित डोंगर आणि ग्रामीण निसर्ग |
![]() |
भातसा धरण – ठाण्याच्या जलपुरवठ्याचा प्रमुख स्रोत |
![]() |
तानसा धरण – शहापूर तालुक्यातील निसर्गदृश्य आणि जलसंग्रहित केंद्र |
![]() |
तानसा लेक – शांत जलसाठा, पर्वतीय पार्श्वभूमी मॉनसूनमध्ये हिरवळ भिजलेली भूमी. |
मुख्य आहार :- शहापूर तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी शेती मोठ्याप्रमाावर केली जाते त्याच प्रमाणे या ठिकाणी मासेमारी सुधा केली जाते तसेच मुख्य आहारामध्ये शाकाहारी आणि मांसाहरी अन्नाचा समावेश होतो.
शाकाहारी अन्नामध्ये :- पालेभाज्या, रानभाज्या, फळे, कडधान्य, भात,
भाकरी याचा समावेश आहारात केला जातो
मासाहारी अन्नामध्ये
:- अंडी, मासे, मटण, चिकन
विस्तार व क्षेत्रफळ :-
सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील
डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड,
कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. शहापूरची संक्षिप्त
ओळख ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या
दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९चौ.कि.मी.
आहे.
शहापूरची
लोकसंख्या :- ठाणे
जिल्हयातील शहापुर तालुका हा आदिवासी तालुका असुन शहापुर तालुक्याची लोकसंख्या सन
2011 च्या जणगणनेनुसार 313151 एवढी आहे.
शहापूरमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा :-
साधारणतः आपल्याकडे सर्वच भागांमध्ये
बहुभाषिक लोक आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्वच भाषा बोलल्या जातात. तसेच शहापूर तालुक्यामध्ये
सुद्धा विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. भाषा ही उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत
व वाक्प्रचारांत बदलत राहते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. प्रामुख्याने
मातृभाषा असलेली मराठी ही इथे बोलतातच, परंतु गावाकडची स्थानिक भाषा तालुक्यात मोठ्या
प्रमाणावर वापरली जाते. ज्यामध्ये आपणांस आगरी, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे
इथे भिल्ल, वारली, कातकरी, गोंड अश्या भाषांचा वापर केला जातो. तसेच परराज्यातून उदरनिर्वाहासाठी
तालुक्यामध्ये आलेले बरेचसे लोक बहुभाषिक आहेत त्यामुळे इथे हिंदी, उर्दू, तामिळ, गुजराती, कोकणी, मालवणी, खानदेशी, वऱ्हाडी, घाटी अश्या विविध
प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी
तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, कातकरी, महादेव कोळी, या,
आदिवासी जमाती आहेत तसेच शहापूर तालूक्यात एकूण लोकसंख्येत कुणबी, आगरी, बौद्ध, मुस्लिम
व मराठा समाजाची लोकसंख्या आहे.
उत्पन्नाचे प्रमुख साधन
:- भरपूर
पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन जास्त असून
"भाताचे कोठार" म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम
बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास होवूनही मात्र नो केमिकल झोन
मुळे औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत.
शहापूर तालुक्यातील एकूण गावे :-
शहापूर तालुका हा ठाणे जिल्ह्यातील
सर्वात मोठा तालुका आहे या तालु्यांमध्ये एकूण २२३ गावे आहेत.
ती गावे पुढीप्रमाणे:-
आदिवली, अघई,
अजनूप, अल्याणी, अंबर्जे, आंबेखोर, आंबिवली, अंदाड, आपटे, अर्जुनली, आसनगाव, आष्टे,
अस्नोली, आटगाव, आवळे, आवरे, बाबरे, बाभळे, बलवंडी, बामणे, बावघर, बेडिसगाव, बेळवड,
बेळवळी, बेंडेकोन, भागदळ, भाकारी, भातसई, भावसे, भिणार, भोरांडे, बिरवाडी, बोरशेती
बुद्रुक, बोरशेती खुर्द, चांदे, चांदगाव, चांदरोटी, चरिव, चेरपोली, चेरवली, चिखलगाव,
चिल्हार, चिंचवळी, चोंढे बुद्रुक, चोंढे खुर्द, दहागाव, दहीगाव, दहीवली, दहीवली तर्फे
कोरकडा, दळखण, दांड, दापुर, डेहणे, देवगाव, ढाढरे, ढाकणे, धामणी, धसई, डिंभे, डोळखांब,
दुघार, फुगळे, गांडुळवड, गेगाव, घाणेपाडा, घोसई, गोकुळगाव, गोळभन, गोठेघर, गुंडे, हाळ,
हेदवळी, हिंगळुद, हिव, जांभे, जांभुळवाड, जरंडी, जुणवणी, कळंभे, कळमगाव, कळभोंडे, कळगाव,
कांबारे, कांबे, कानडी, कानवे, कानविंदे, कराडे, कासगाव, कसारा बुद्रुक, कसारा खुर्द,
काष्टी, कातबाव, कवडास , खैरे, खराडे, खरांगण, खर्डी, खरिड, खरिवळी, खातिवळी, खोर,
खोस्ते, खुटाडी, खुटघर, किन्हेशेत, किन्हवली, कोशिमबडे, कोठाळे, कोठारे, कुडशेत, कुकंभे,
कुल्हे, लाहे, लवले, लेणाड बुद्रुक, माळ, मालाड, मळेगाव, मामनोळी, मानेखिंड, माणगाव,
मांजरे, मासावणे, मोहिली, मोखावणे, मुगाव, मुसई, नडगाव, नांदगाव, नांदवळ, नारायणगाव,
नेहरोळी, नेवरे, पाचिवरे, पाल्हेरी, लेणाड खुर्द, लिंगायते, मढ, माहुली, पाली, पळशीण,
पळसोळी , पाचघर, परटोळी, पाषाणे, पाटोळ, पेंढरघोळ, पेंढरी, पिंपळपाडा, पिंगळवाडी, पिवळी,
फोफोडी, पुंढे, रानविहीर, रास, रातांधळे, रोडवाहाळ, साजिवली, साकडबाव, साखरोळी, साकुर्ली,
साने, सापगाव, सरळांबे, सारंगपुरी, सारमाळ, साठगाव, सावरोली, सावरोली बुद्रुक, सावरोली
खुर्द, शहापूर, शिळ, शेई, शेलवली, शेणवे, शेंडे, शेंद्रून, शेंद्रून बुद्रुक, शेरे,
शिलोत्तर, शिरगाव, शिरोळ, शिरवांजे, शिवाजीनगर, शिवनेरी, सोगाव, सुसरवाडी, टहारपूर,
तळवडे, तानसा, टेंभरे, टेंभरे बुद्रुक, टेंभे, टेंभुर्ली, ठिळे, ठुणे, ठुणे बुद्रुक,
तुते, उंबरखांड, उंभराई, उंबरावणे, वाचकोळे, वाफे, वाघिवळी, वाल्मिकनगर, वालशेत, वांद्रे,
वरसकोळ, वाशाळा बुद्रुक, वाशाळा खुर्द, वाशिंद, वावेघर, वेडवहाळ, वेहलोळी, वेहलोळी
बुद्रुक, वेहलोळी खुर्द, वेहलोंडे, वेळुक, विहिगाव, विठोबाचेगाव, वाळशेत तसेच शहापूर
तालु्यातील काही गावे ही सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले आहे आपण यागावानं मध्ये गेलात
तर आपणास तालुक्याच्या पूर्वेस सह्याद्री पर्वरांग लाभलेली दिसते.
ब्रिटीश काळीन शासकीय
ऑफीस :- ब्रिटीश
काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत.
प्रशीक्षण
विद्यालय :- ग.
वि. खाडे विद्यालय शहापूरची
स्थापना १९३९ मध्ये झाली आणि त्याचे व्यवस्थापन प्रा. मदत केली. हे ग्रामीण भागात आहे.
हे विद्यालय महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये आहे. शाळेमध्ये
५ ते १२ पर्यंत इयत्ते आहेत. या शाळेत मराठी हे शिक्षणाचे माध्यम आहे. या शाळेला खेळाचे
मैदान आहे. शाळेचे वाचनालय असून या ग्रंथालयात २३४३१ पुस्तके आहेत. १९४१ मध्ये शहापूर
येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात
आले.
महाराष्ट्रातील
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी आणि मागासलेल्या समुदायांच्या शैक्षणिक
गरजा पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट १९८४ मध्ये ज्ञानवर्धिनी नावाच्या खाजगी ट्रस्टने एस.बी. कॉलेज ची स्थापना केली. महाविद्यालय
१९८४ ते १९८८ या काळात विनाअनुदान तत्त्वावर
कार्यरत होते आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून १०० टक्के अनुदान मिळाले. कॉलेज आता
६ शैक्षणिक कार्यक्रम ऑफर करते: पाच अंडरग्रेजुएट स्तरावर पोस्ट ग्रॅज्युएट याशिवाय,
महाविद्यालय यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (Y.C.M.O.U.), नाशिकच्या कला आणि
वाणिज्य शाखेतील UG स्तरावरील कार्यक्रमासाठी अभ्यास केंद्राचे व्यवस्थापन करत आहे.
![]() |
१९८४ मध्ये ज्ञानवर्धिनी नावाच्या खाजगी ट्रस्टने एस.बी. कॉलेज स्थापना केली. |
![]() |
ग. वि. खाडे विद्यालय स्थापना १९३९ मध्ये झाली |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
🌿 “आपले विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत 🙏 या लेखातलं काय तुम्हाला आवडलं, कोणता अनुभव आठवला किंवा काही वेगळं मत असेल तर ते नक्की comments मध्ये शेअर करा. तुमची प्रतिक्रिया पुढच्या लेखासाठी प्रेरणा ठरेल ✨”